छत्री वापरून अपूर्णांकांची तोंडओळख
छत्री
शिक्षिका: मुलांनो, ही छत्री बघा! मी ती उघडते… आता नीट बघा. छत्रीच्या आत कितीतरी समान आकाराचे भाग दिसत आहेत. चला, सगळे मिळून मोजूया! एक… दोन… तीन… चार… असं करत करत सगळे भाग मोजा.
विद्यार्थी: [विद्यार्थी छत्रीचे समान भाग मोजतात.]
शिक्षिका: वा! म्हणजे आपल्या छत्रीत एकूण ___ समान भाग आहेत! आता या भागांपैकी मी ___ भाग निवडते… हे बघा, मी त्यांच्यावर खडूने खूण केली. आता सांगा बरं मी एकूण किती भाग निवडले?
विद्यार्थी: दोन!
शिक्षिका: अगदी बरोबर! पण आता आणखी एक मजेशीर प्रश्न- या छत्रीच्या एकूण भागांपैकी मी किती भाग निवडले आहेत? जरा विचार करा… आज आपण हेच शोधणार आहोत!