वर्तमानपत्राचे पान कापून अपूर्णांकांची तुलना
वर्तमानपत्राचे पान कापून अपूर्णांकांची तुलना
शिक्षिका: मुलांनो, हे वर्तमानपत्राचं पान बघा. मी हे पान चार समान भागांत कापलं आहे. चला, सगळे भाग मोजूया. एक… दोन… तीन… चार!
आता बघा-मी तीन भाग या हातात घेतले आहेत आणि एक भाग या हातात. सांगा बरं, या हातात किती भाग आहेत?
विद्यार्थी: ...
शिक्षिका: आणि या हातात?
विद्यार्थी: ...
शिक्षिका: म्हणजे एका हातात चारपैकी तीन भाग आहेत आणि दुसऱ्या हातात चारपैकी एक भाग. हे आपण अपूर्णांकात कसं लिहू?
विद्यार्थी: तीन छेद चार आणि एक छेद चार!
शिक्षिका: अगदी बरोबर! आता दोन्ही हातांकडे नीट बघा. तीन छेद चार मोठा की एक छेद चार?
विद्यार्थी: तीन छेद चार!
शिक्षिका: हो! कारण दोन्ही ठिकाणी भागांची संख्या चारच आहे. फक्त घेतलेले भाग वेगळे आहेत-इथे तीन, आणि इथे एक.
म्हणून आपण म्हणतो- तीन छेद चार > एक छेद चार
आता जर मी या एका भागालाही त्या तीन भागांच्या हातात ठेवले, तर काय होईल?
विद्यार्थी: चार छेद चार!
शिक्षिका: आणि चार छेद चार म्हणजे?
विद्यार्थी: पूर्ण!
शिक्षिका: शाब्बास!